Join us  

२८५ प्रजातींच्या फुलपाखरांना मिळणार मराठी नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:51 AM

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा पुढाकार; निसर्गप्रेमी, अभ्यासकांना सूचना पाठविण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने राज्यातील २८५ फुलपाखरांना मराठीमध्ये नाव देण्यासाठी संभाव्य यादी नुकतीच जाहीर केली. बहुतेक फुलपाखरांची नावे इंग्रजीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना मराठीतून नावे देण्याची मोहीम सुरू केली आहे. निसर्गप्रेमी, जैवविविधता अभ्यासक, तज्ज्ञ, नागरिकांकडून फुलपाखरांच्या मराठी नावांवर मते, सूचना पाठविण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्रात २८५ प्रजातींचे फुलपाखरे आढळतात. फुलपाखरांना ओळखण्यासाठी लॅटिन भाषेत शास्त्रीय नावे किंवा इंग्रजीत नावे आहेत. देशात फुलपाखरांचा अभ्यास ब्रिटिशांच्या काळात झाल्याने फुलपाखरांना ब्रिटीश अधिकाऱ्यांनी नावे दिली होती. सामान्यत: नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, अंगावरील ठिपके, सवय, वागणूक, सहवास किंवा शोधकर्त्यावरून देण्यात आली. परंतु, महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीतून नावे असावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यात आढळणाºया फुलपाखरांची नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अभ्यासक, निसर्गप्रेमी आदींना विविध माध्यमांद्वारे नावे पाठवून त्यावर सर्वांची मते, सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शैक्षणिक विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. राजू कसंबे म्हणाले, फुलपाखरांची नावे मराठीत असावीत. यावर तीन वर्षांपासून विचार सुरू होता. इंग्रजीतील कठीण नावाऐवजी फुलपाखरांना मराठी नावे देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या पुढाकाराने घेण्यात आला.नावे ठरविण्यासाठी समितीची स्थापनामहाराष्ट्रातील फुलपाखरांना सोपी व लक्षात ठेवता येतील अशी मराठीतून नावे असावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना नावे ठरविण्यास एक समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यात आढळणाºया फुलपाखरांची नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार केली आहे.