Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी ज्ञानभाषा होणो आवश्यक

By admin | Updated: December 7, 2014 02:07 IST

सर्व विषयांतील ज्ञान सामान्यांर्पयत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता अनेक विषय मराठीत उपलब्ध करून देणो गरजेचे आहे.

मुंबई : सर्व विषयांतील ज्ञान सामान्यांर्पयत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता अनेक विषय मराठीत उपलब्ध करून देणो गरजेचे आहे. जेणोकरून, मराठी ज्ञानभाषा होण्याकडे वाटचाल करेल.  वास्तव भानातून सकस साहित्यकृतीची निर्मिती होते, असे मत संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. 
मुंबई मराठी साहित्य संघ आणि साठय़े महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, प्रा. उषा तांबे, साठय़े महाविद्यालयाच्या प्रा. कविता रेगे आदी मान्यवर उपस्थित होते.  गोडबोले पुढे म्हणाले की, समाज मानसिकतेचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आपण आपल्या मुलांना  वेगळ्या प्रकारचा विचार करण्यास प्रोत्साहन देत नाही. एका चौकटीत त्यांना विचार करण्यास भाग पाडतो. मुलांना चौकटीबाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करा. वेगवेगळ्या अनुभवातून आलेले साहित्य हे श्रेष्ठ असते.
या वेळी अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली की, पुस्तके आयुष्यभर सोबत करतात. दुर्गा भागवत यांच्या पुस्तकांची साथ लाभली आणि पुस्तकांची खोली उमजली. पुस्तकाच्या स्पर्शातून लेखकाचे व्यक्तिमत्त्व आपल्यार्पयत पोहोचते. पुस्तक वाचा, नाटक वाचा, फक्त वाचून थांबू नका तर त्यावर चिंतन करायला शिका, याबाबत तुम्हाला प्रश्न पडणो आवश्यक आहे, असा सल्लाही तिने तरुणाईला दिला. यानंतर संमेलनातील ‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ या सत्रत नेमबाज अंजली भागवत म्हणाली की, आवडत्या क्षेत्रत झोकून देणो आवश्यक असून त्यासाठी ध्येयपूर्तीचा ध्यास घेणो तेवढेच आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करत रायफल शूटिंगचा रोमांचकारी प्रवास विद्याथ्र्यांसमोर उलगडला. यशाच्या शिखरावर असले तरी आजही नवोदित खेळाडूंबरोबर शिकण्याची संधीही दवडत नाही, असेही तिने आर्वजून सांगितले.
या सत्रनंतर अभिनय देव यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन जीवन, जाहिरात क्षेत्रतील अनुभव तसेच याबाबत घरच्यांचा सहभाग आदी किस्से-गमती अभिनय देव यांनी सांगितल्या.  (प्रतिनिधी)
 
च्या प्रवासाबद्दल ते म्हणाले, मी अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रतील बहुमान समजला जाणारा कान्स हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण फायनलर्पयत पोहोचूनही यश मिळत नव्हते. त्यानंतर मी या पुरस्काराचा विचार सोडून दिला तेव्हा त्या वर्षी मला हा पुरस्कार प्राप्त झाला.
 
च् जेव्हा एखाद्या गोष्टीमागे धावतो, तेव्हा ती कधीच मिळत नाही. तिचा विचार करणो सोडतो तेव्हा ती आपोआप आपल्याला मिळते. एखादा निर्णय घेताना सर्वाचे मत जाणावे, पण निर्णय मात्र घेताना आपल्या मनाचेच ऐकावे, असा सल्ला अभिनय यांनी दिला.