Join us

मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:08 IST

मुंबई : ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ व ‘अंबर भरारी’ आयोजित ६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार जाहीर ...

मुंबई : ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ व ‘अंबर भरारी’ आयोजित ६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘काळी माती’, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता निखिल रत्नपारखी, सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक भक्ती जाधव यांचा समावेश आहे.

इतर पुरस्कारांमध्ये परीक्षक विशेष पुरस्कार चित्रपट ‘श्री राम समर्थ’ या चित्रपटास जाहीर झाला असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता परीक्षक पुरस्कार अभिनेते शंतनू मोघे यांना याच चित्रपटासाठी मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री परीक्षक पुरस्कार परी जाधव यांना ‘आवर्तन’ या चित्रपटासाठी घोषित झाला आहे.

गेली अनेक वर्षे नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना ‘कारकिर्द सन्मान पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. विविध भूमिकांच्या माध्यमातून अभिनयाचा खास ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या महोत्सवात दाखल झालेल्या एकूण ४७ पैकी २८ चित्रपट विविध विभागांत नामांकनाच्या यादीमध्ये आहेत. त्यात फनरल, प्रवास, प्रीतम, अन्य, काळी माती, निबार, ईमेल फिमेल या चित्रपटांचा समावेश आहे.