Join us  

मराठ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवू!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 6:40 AM

स्वस्वार्थासाठी समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करणाºया स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवेल, असा इशारा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.

मुंबई  - स्वस्वार्थासाठी समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करणाºया स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवेल, असा इशारा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पाटील म्हणाले की, समन्वयक म्हणून काही लोक शिवसेना नेते व शिवसेना पक्षप्रमुखांना भेटत आहेत, तर काही स्वयंघोषित समन्वयकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:ला समन्वयक म्हणवून घेत, आमदारांना सोबत घेऊन विविध नेत्यांच्या भेटी घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा लोकांना ठोक मोर्चाकडून जशास तसे उत्तर देण्यात येईल.समन्वयक रमेश केरे-पाटील म्हणाले, काही समन्वयकांनी मराठा समाजाच्या नावावर राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. मुळात मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चाची स्थापना मराठा आरक्षणासाठी आहे. त्याचा कोणालाही गैरवापर करता येणार नाही. ‘बंद’ची हाक कोणी दिली, कुणाच्या सांगण्यावरून ही आंदोलने पेटली, आदींचे खुलासे झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.राजकीय व्यक्तींना ‘नो एंट्री’मराठा आरक्षणासह महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात ठोक मोर्चातर्फे लवकरचतुळजापूर येथे राज्यव्यापी बैठक होईल. त्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल.या बैठकीत सर्व जिल्हा व तालुकानिहाय होणाºया सभा व बैठकांची आखणीहोईल, तसेच तालुका व जिल्हानिहाय मराठा समन्वयकांची समिती स्थापन केलीजाईल. या समितीतील समन्वयकांचा राजकीय पक्ष, आमदार, खासदार किंवामंत्र्यांशी संबंध नसेल. राजकीय व्यक्तीने स्वत:ची माणसे पेरण्याचा प्रयत्नकेल्यास, त्याला राज्यभर फिरू देणार नाही, असा इशारा ठोक मोर्चाने दिला.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चाबातम्या