Join us

जगाच्या नकाशावर झळकणार

By admin | Updated: May 29, 2015 00:31 IST

देशातील सर्वात चांगल्या सुविधा नवी मुंबईमधील नागरिकांना मिळत आहेत. भविष्यात जगाच्या नकाशावर नवी मुंबईचे नाव ठळकपणे दिसेल असे काम केले जाईल.

नवी मुंबई : देशातील सर्वात चांगल्या सुविधा नवी मुंबईमधील नागरिकांना मिळत आहेत. भविष्यात जगाच्या नकाशावर नवी मुंबईचे नाव ठळकपणे दिसेल असे काम केले जाईल. शिक्षण, आरोग्यासह सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधांवर भर देण्यात यईल. असून प्रत्येक घटकांचा विचार होईल, अशी ग्वाही महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली. त्यांनी गुरुवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शहराच्या विकासाविषयीच्या संकल्पनांची माहिती दिली. नवी मुंबईतील विकासकामांचे योग्य नियोजन केले जाईल. पारदर्शी कामकाजावर भर असेल. जागतिक दर्जाचे शहर अशी ओळख निर्माण केली जाईल. महापालिकेची तीन रुग्णालये पुढील काही महिन्यांत सुरू होतील. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर दिला जाईल. रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज विद्यालय या शाळेत खाजगी शाळांएवढ्याच उत्तम सुविधा देण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर इतर शाळांचाही दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल. झोपडपट्टी परिसरातही सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाढत्या झोपड्यांना एमआयडीसीचे अधिकारीही जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेस स्वच्छता अभियानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु अद्याप शहरात पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. ही स्थिती बदलावी लागेल. झोपडपट्टी परिसरात मोबाइल टॉयलेट बसविण्यासही जागा मिळत नाही. शहरात आवश्यक त्या ठिकाणी चांगली प्रसाधनगृहे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. शहरात अनधिकृत फेरीवाल्यांवरही तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनी विश्वास दाखवून काम करण्याची संधी दिली आहे. शहराच्या हितासाठी नियोजनबद्धपणे व सर्वांना विश्वासात घेवून काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सिडकोला विरोध च्राष्ट्रवादी काँगे्रसने सिडको हटावचा नारा दिला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना महापौरांनीही महापालिका क्षेत्रात सिडकोची गरज नसल्याचे मत स्पष्ट केले आहे. या ठिकाणी सिडकोचे काम संपले आहे. च्येथील सर्व जबाबदारी महापालिकेवर दिली पाहिजे. जमीन फ्री होल्ड झाली पाहिजे. नागरिकांना सिडकोकडे माराव्या लागणाऱ्या फेऱ्या थांबाव्या, असे मत व्यक्त केले. एसआरएचा फायदा नाही शहरात सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे परवडत नसल्यामुळे नाइलाजाने अनेकांना झोपड्यांमध्ये राहावे लागते. अनधिकृत झोपड्या रोखण्यासाठी मोकळ्या भूखंडांना कुंपण घातले पाहिजे.झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी एसआरए योजनाही फायदेशीर ठरली नाही. त्यामध्ये शासनालाही व झोपडीधारकांनाही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट मत महापौरांनी व्यक्त केले.