जयंत धुळप, अलिबाग
जैवविविधतेने समृध्द म्हणून अलिबागचा परिसर ओळखला जातो. या परिसरात ९०० हून अधिक वनस्पती प्रजाती, ३१६ प्रकारचे पक्षी, २७ सापांच्या प्रजाती, १२५ हून अधिक फुलपाखरे, २० प्राण्यांच्या प्रजाती आणि इतर अनेक प्रकारच्या सजीवांचे वास्तव्य असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी नागाव येथे ग्रामीण जैवविविधता संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही जैवविविधता वाचवून संवर्धित करण्याकरिता संयुक्तरीत्या प्रयत्न करण्याचा निर्धार अलिबाग, उरण, रोहा, मुरुड, चौल आणि रेवदंडा परिसरातून आलेल्या सुमारे १०० निसर्ग मित्रांनी केला आहे.
अलिबाग परिसरातील जैवविविधतेला असलेला हा धोका ओळखून अनेक जण निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय आहेत.या सर्वांना एकत्र आणून ते करीत असलेल्या संवर्धनकार्याबाबत शास्त्रीय बैठक निर्माण व्हावी तसेच त्यांच्या प्रयत्नांना सुयोग्य मार्गदर्शन लाभावे या अनुषंगाने निसर्गमित्र, अलिबाग,इला फाउंडेशन, पुणे, अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने येथून जवळच नागाव येथील कर्पेवाडीमध्ये रविवारी या एकदिवसीय ‘ग्रामीण जैवविविधता संवर्धन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.एफ. थळचे कार्यकारी संचालक आर.के. जैन, फणसाड अभयारण्याच्या सहाय्यक वनसंरक्षक सरोज गवस, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर उपस्थित होते. सुप्रसिध्द पक्षितज्ज्ञ डॉ.सतीश पांडे यांनी विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी अधिवास वाचविणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले तसेच परिसरातील प्रदेशनिष्ठ पक्षी, प्राणी, नामशेष होण्याच्या मार्गावरील प्रजाती याबरोबरच स्थानिक लोकांचे निसर्गविषयीचे ज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.
इला फाउंडेशनच्या डॉ. सुरुची पांडे, राजगोपाल पाटील, डॉ.सतीश करमळकर, राहुल लोणकर, राजकुमार पवार आणि पाणी पंचायतीचे प्रशांत बोरावके यांनी विविध संवर्धन विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ.आर.ए.महाजन यांनी घरातील टाकाऊ वस्तूंमधून चिमण्यांसाठी घरटे आणि पक्ष्यांना पाणी पिण्याचे साधन कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. डॉ. वैभव देशमुख यांनी पक्षी जगताची ओळख करुन दिली.
अलिबाग परिसरातील जैवविविधतेला अनेक धोके
By admin | Updated: March 12, 2015 22:32 IST
जैवविविधतेने समृध्द म्हणून अलिबागचा परिसर ओळखला जातो. या परिसरात ९०० हून अधिक वनस्पती प्रजाती, ३१६ प्रकारचे पक्षी, २७ सापांच्या प्रजाती
अलिबाग परिसरातील जैवविविधतेला अनेक धोके
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}