मोखाडा ग्रामीण : आधुनिक तंत्रज्ञानात आदिवासी विद्यार्थीही मागे राहू नयेत, यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत संगणक योजना राबवली व लाखो रू. चे संगणक उपलब्ध करून देण्यात आले. परंतु प्रशिक्षणाचा अभाव आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळू शकले नाही. उलट लाखो रू. चे संगणक अनेक शाळांमध्ये सध्या धूळखात पडले आहेत.मोखाडा तालुक्यात एकूण १५८ शाळा आहेत व केंद्र शाळा १३ आहेत. यामध्ये तालुक्यातील शाळांमध्ये ६१ च्या आसपास संगणकांची सोय केलेली आहे व कभा हायस्कूल सातुली, किनिस्ते, मोखाडा, खोडाळा, आसे, सूर्यमाळ येथील शाळांना संगणक देण्यात आले, परंतु प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकच नसल्यामुळे या संगणकांचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला नाही. काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान मिळवण्यासंदर्भात आस्था न दाखवल्यामुळे त्या शाळेतील संगणक आजही धूळखात पडले. (वार्ताहर)
शाळांतील अनेक संगणक धूळखात
By admin | Updated: July 21, 2014 00:44 IST