Join us  

Manohar Parrikar Death Update : मनोहर पर्रीकर यांना लष्कराकडून अखेरची मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 8:48 PM

मुंबई -  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची ...

18 Mar, 19 05:38 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव मिरामार येथील SAG मैदानावर आणण्यात आले असून अंत्यविधी सुरु झाले आहेत. थोड्याच वेळात मुखाग्नी देण्यात येणार आहे. 

18 Mar, 19 05:20 PM

नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर तासाभरात निर्णय : गडकरी

नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही. यामुळे गोव्यात नेतृत्वाचा तिढा सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुटू शकला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व भाजपच्या कोअर टीमने खूप प्रयत्न केले तरी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे दोन्ही पक्ष अजून आपल्या अटींवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते दोन उपमुख्यमंत्रीपदे मागत आहेत. 

18 Mar, 19 04:25 PM

मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून त्यांचे पार्थिव कला अकादमीच्या बाहेर आणण्यात आले आहे. पर्रीकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय लोटला आहे. जवळच असलेल्या मिरामार बीचवर पर्रीकर यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

18 Mar, 19 03:48 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

18 Mar, 19 03:43 PM

गोव्याचा शिमगोत्सव रद्द; नवीन तारीख लवकरच जाहीर करणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे गोवा पर्यटन विभागाने शिगमोत्सव २१-२४ मार्च २०१९, दरम्यान निर्धारित करण्यात आलेला उत्सव रद्द केला आहे. शिमगोत्सवाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

18 Mar, 19 02:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून ते लगेचच दिल्लीला रवाना होणार आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शहा हे पर्रीकर यांच्या अंत्यविधीसाठी थांबणार आहेत.

18 Mar, 19 02:44 PM

पंतप्रधान मोदींकडून पर्रीकरांच्या कुटुंबीयांचं सांत्वन



 

18 Mar, 19 02:38 PM

मोदींकडून मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण



 

18 Mar, 19 02:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल, मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण

18 Mar, 19 01:42 PM

काँग्रेस आमदारांचे गोवा राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र

काँग्रेस आमदारांचे गोवा राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र दिले असून सत्तास्थापनेची संधी देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असून विधानसभा निलंबित न करता किंवा भाजपला संधी न देता काँग्रेसला संधी देण्याची मागणी आमदारांनी सिन्हा यांची भेट घेऊन केली आहे. 

18 Mar, 19 01:37 PM

प्रमोद सावंत यांच्या नावासाठी भाजप आग्रही; मित्रपक्षांचा विरोध

18 Mar, 19 01:07 PM

गोव्याचा नवा मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता ठरणार; 3 वाजता शपथविधी

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचा उत्तराधिकारी कोण याच्या नावाची घोषणा भाजपा दुपारी 2 वाजता करणार आहे. तर  3 वाजता शपथविधी होणार आहे. काँग्रेसनेही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 

18 Mar, 19 12:57 PM

मनोहर पर्रीकरांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात - प्रकाश जावडेकर

18 Mar, 19 12:46 PM

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी



 

18 Mar, 19 12:29 PM

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीत दाखल.

18 Mar, 19 12:22 PM

मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव भाजपा कार्यालयातून पणजीच्या कला अकादमी येथे अंत्यदर्शनासाठी रवाना

18 Mar, 19 12:21 PM

मनोहर पर्रीकरांच्या निधनानं राजकारणात मोठी पोकळी - मल्लिकार्जुन खर्गे

18 Mar, 19 12:05 PM

...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले


18 Mar, 19 11:55 AM

कला अकादमीत पर्रीकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी

18 Mar, 19 11:46 AM

भाजप मुख्यालयाकडून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीकडे रवाना

18 Mar, 19 11:40 AM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना आज अखेरचा निरोप



 

18 Mar, 19 11:21 AM

मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू



 

18 Mar, 19 11:07 AM

मनोहर पर्रीकर सच्चे देशभक्त होते - योगी आदित्यनाथ

18 Mar, 19 10:52 AM

भाजपाचे नेते अंत्यदर्शनासाठी कार्यालयात दाखल



 

18 Mar, 19 10:41 AM

अंत्यदर्शनासाठी मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव भाजप कार्यालयात



 

18 Mar, 19 10:34 AM

मनोहर पर्रीकरांचं देशाच्या संरक्षणात मोठं योगदान- सुरेश प्रभू

18 Mar, 19 10:26 AM

मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट



 

18 Mar, 19 10:09 AM

मनोहर पर्रीकरांचं योगदान गोवेकर कधीही विसरणार नाहीत - मुख्यमंत्री

18 Mar, 19 09:53 AM

पार्थिव निवासस्थानाकडून भाजपा कार्यालयाकडे रवाना



 

18 Mar, 19 09:49 AM

मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव अंत्ययात्रेसाठी याच विशेष ट्रकमध्ये ठेवण्यात येणार आहे. हा ट्रक फुलांनी सजवण्यात आला आहे.



 

18 Mar, 19 09:42 AM

मुख्यमंत्री पर्रीकरांच्या निधनामुळे गोव्यातील मुंबई कोर्टाचे खंडपीठ आणि जिल्हा कोर्ट आज बंद राहणार.

18 Mar, 19 09:38 AM

मनोहर पर्रीकरांचं पार्थिव सकाळी पणजीच्या कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

18 Mar, 19 09:33 AM

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..



 

18 Mar, 19 09:06 AM

'उत्तुंग चारित्र्य अन् कर्तृत्व असणारा नेता', राज ठाकरेंची पर्रीकरांना 'मनसे श्रद्धांजली'



 

18 Mar, 19 08:50 AM

पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी

18 Mar, 19 08:37 AM

पडद्यावरच्या पर्रीकरांची मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली, योगेश सोमण झाले भावुक



 

18 Mar, 19 08:26 AM

मित्र असावा ऐसा नेता, पंचतारांकीत उद्योजक नव्हे तर कार्यकर्तेच होते ''पर्रीकरांची दोस्तकंपनी''



 

18 Mar, 19 08:16 AM

साधा माणूस, 'दादा' माणूस... पर्रीकर पर्वाचा अस्त



 

18 Mar, 19 08:06 AM

'एका वादळाचा अस्त', देशानं 'साधा अन् भारी' माणूस गमावला



 

18 Mar, 19 08:05 AM

आठवणीतील अमूल्य ठेवा



 

18 Mar, 19 07:55 AM

मनोहर पर्रीकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री गोव्यात उपस्थित राहणार आहेत.

17 Mar, 19 11:39 PM

मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी - अमित शहा



 

17 Mar, 19 11:32 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मनोहर पर्रीकर यांना वाहिली श्रद्धांजली



 

17 Mar, 19 11:28 PM

मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोव्यात सात दिवसांचा दुखवटा



 

17 Mar, 19 11:25 PM

मनोहर पर्रीकर हे असामान्य नेते, आधुनिक गोव्याचे शिल्पकार - नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली



 

17 Mar, 19 09:42 PM

सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, अर्धाच फडकणार तिरंगा



 

17 Mar, 19 09:03 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही परीकरांना श्रद्धांजली



 

17 Mar, 19 09:01 PM

पर्रीकरांच्या निधनानंतर सोशल मीडिया भावूक, आठवणींना उजाळा अन् साधेपणाचीच चर्चा

ट्विटरवरही मनोहर पर्रीकर या हॅशटॅग ट्रेंड करत आहे. 



 

17 Mar, 19 08:51 PM

शरद पवार यांच्याकडून ट्विटरवरुन मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली



 

टॅग्स :मनोहर पर्रीकरशरद पवार