Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा कुमारीने दिली दिग्दर्शकाच्या कानशिलात

By admin | Updated: December 13, 2014 02:19 IST

‘मुंबई कॅन डान्स साला’ या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक सच्चेंद्र शर्मा यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई : ‘मुंबई कॅन डान्स साला’ या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक सच्चेंद्र शर्मा यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. मनीषा कुमारी हिच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
सांताक्रुझमधील एका हॉटेलमध्ये काल रात्री या चित्रपटाचे म्युङिाक लाँच होते. या कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन राखीची मैत्रीण मनीषा कुमारी हिने शर्मा यांच्या सर्वासमक्ष कानशिलात भडकावली. त्यानंतर मनीषाने शर्मा यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. शर्मा यांनी कास्टिंगमध्ये आपल्यासोबत असभ्य वर्तन केले, असा तिचा दावा होता. 
तसेच शर्मा यांनी चित्रपटातील राखीचे गाणो का वगळले, असा जाबही विचारण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर मनीषाने सांताक्रुझ पोलीस ठाणो गाठले. तेथे शर्माविरोधात विनयभंगाची तक्रार दिली. तिचा जबाब नोंदवून मध्यरात्री पोलिसांनी शर्माविरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)