Join us

मनीषा जाधव यांचा कोरोनाने बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:06 IST

मनीषा जाधव यांचा कोरोनाने बळीशिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या ...

मनीषा जाधव यांचा कोरोनाने बळी

शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचे सोमवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्या ५१ वर्षांच्या हाेत्या. मागील वर्षभरापासून कोरोना संक्रमणाच्या संघर्षात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

डॉ. जाधव यांनी ‘गुडमॉर्निंग, कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल. शरीर निघून जाते मात्र आत्मा कायम राहतो,’ अशा आशयाची फेसबुकवर अखेरची पोस्ट शेअर केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कोरोनाशी दिलेल्या लढाईनंतर डॉ. जाधव यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राने हळहळ व्यक्त केली आहे.

डॉ. जाधव यांचे सहकारी असलेले शिवडी रुग्णालयातील दिलीप मकवाना यांनी सांगितले, डॉ. जाधव यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

..................................