Join us

माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा, नाराज असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:54 IST

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आपल्या विधानपरिषदेतील उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई - काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आपल्या विधानपरिषदेतील उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 27 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. पण, आठ दिवस आधीच त्यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे सध्या विधानपरिषेदेचे उपसभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपत आहे. त्यानंतर विधानपरिषदेत संख्याबळ वाढल्यामुळे या सभागृहाचे महत्त्वाचे उपसभापतीपद मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, कार्यकाळ संपण्यापूर्वीच माणिकराव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर आता उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबतही चर्चेला उधाण आले आहे.