Join us

महामार्गावर होणार आता आंबा विक्री

By admin | Updated: April 1, 2015 00:13 IST

मुंबई, नाशिकलाही स्टॉल्स : शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : पर्यटकांना दर्जेदार आंबा उपलब्ध व्हावा व येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, याकरिता पणन महामंडळातर्फे अधिकृ त स्टॉल्स उभारले जाणार आहेत. मुुंबई - गोवा महामार्गाबरोबरच मुंबई व नाशिक येथे स्टॉल्स टाकून आंबा विक्री करण्यात येणार आहे.हवामानाचे धक्के खात खात हापूसचे मंद गतीने का होईना, बाजारात आगमन झाले आहे. मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांना गावात जाऊन आंबा खरेदी करणे शक्य होत नाही. महामार्गालगत काही विक्रेते निकृष्ट प्रतीचा आंबा विकून पर्यटकांची फसवणूक करतात. त्यामुळे पर्यटकांना दर्जेदार आंबा मिळावा शिवाय आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी पणन महामंडळातर्फे गतवर्षीपासून प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी अधिकृत स्टॉल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी जिल्ह्यातील बागायतदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.मुलांची परीक्षा संपल्यानंतर कोकणात पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत महामार्गावर स्टॉल्स सुरु करण्यात येणार आहेत. मुुंबई व नाशिक येथेही स्टॉल्स उभारुन आंबा विक्री करण्यात येणार आहे. संबंधित स्टॉल्ससाठी आंबा पाठवण्यास बागायतदार तयार झाले आहेत. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना उत्कृष्ट व दर्जेदार आंबा उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यातील शेतकरी आंबा विक्रीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत असतात. चांगल्या प्रतीचा आंबा मार्केटमध्ये पाठवला गेल्याने जिल्ह्यामध्ये पर्यटकांना चांगल्या प्रतीचा आंबा उपलब्ध होऊ शकत नाही. कमी प्रतीचा आंबा किरकोळ बाजारपेठेमध्ये विक्री केली जाते. त्यामुळे चांगल्या प्रतीचा आंबा यावर्षीपासून पर्यटकांना सुमारे दीड ते दोन महिने उपलब्ध होणार आहे. कोकणी मेव्यासह आंब्याची चव पर्यटकांना यावर्षीपासून चाखता येणार आहे. (प्रतिनिधी)पणन महामंडळातर्फे उभारले जाणार अधिकृत स्टॉल्स.गतवर्षीपासून सुरू आहेत पणन महामंडळाचे प्रयत्न.हवामानाचे धक्के खात खात हापूसचे बाजारात आगमन.कमी प्रतीचा आंबा किरकोळ बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध.चांगल्या प्रतीचा आंबा दीड दोन महिने उपलब्ध होणार.बागायतदारांची बैठक.