Join us

मंगळसूत्र चोरीच्या घटना सुरुच

By admin | Updated: January 28, 2015 23:04 IST

थरारक पाठलाग करीत मंगळसूत्र चोरटयांना कळवा पोलीसांनी पकडले असले तरी मंगळसूत्र चोरीच्या घटना मात्र सुरुच आहेत.

ठाणे : थरारक पाठलाग करीत मंगळसूत्र चोरटयांना कळवा पोलीसांनी पकडले असले तरी मंगळसूत्र चोरीच्या घटना मात्र सुरुच आहेत. रविवारी एकाच दिवसात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून दोन लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविला.मुलुंड पूर्व गवाणपाडा भागातील अर्चना चाळके या घंटाळी नौपाडा भागातून चरईमार्गे १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास जात असतांना त्यांच्या गळयातील ४० हजारांचे मंगळसूत्र तसेच गीता नायक यांच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र आणि ४८ हजारांची सोन्याची माळ हिसकावून दोघांनी पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा प्रकार वसंतविहार भागात सायंकाळी ८ वा. च्या सुमारास घडला. शाल्मली इमारतीमधील रहिवासी हेमलता रणदिवे या त्यागराज इमारतीसमोरील पदपथावरुन पायी जात असतांना समोरुन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटोळे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)