Join us
Daily Top 2Weekly Top 5

आनंदराव अडसूळ यांना पत्नी शोक

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 20, 2024 10:21 IST

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ (७२ ) यांचं अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झालं.

मुंबई - माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ (७२ ) यांचं अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांचे सुपुत्र, शिंदे सेनेचे सचिव,माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी लोकमतला ही दुःखद माहिती दिली.

त्यांच्या पश्चात पती आनंदराव अडसूळ,एक मुलगा,सून,दोन विवाहित कन्या,जावई,नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या कांदिवली (पूर्व),५/बी, कदमगिरी, अशोक नगर  येथून अंत्ययात्रा निघणार असून कांदिवली (पश्चिम) डहाणूकर वाडी स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :आनंदराव अडसूळमुंबई