Join us

आवडत्या क्षेत्राला मॅनेजमेंटचा चश्मा!

By admin | Updated: July 28, 2015 01:26 IST

एमबीए म्हटले की, व्यवसायातील विविध बाबींची माहिती देणारा अभ्यासक्रम. मात्र केईटी अर्थात कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त आवडत्या

मुंबई : सामाजिक बांधिलकी म्हणून अनावश्यक रुढी-परंपरा मोडून टाका. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी देहदान करा, असे आवाहन सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने केले आहे.कोकणचे इतिहासतज्ज्ञ अण्णा शिरगावकर यांनी नुकतेच स्वत:चे नेत्रदान आणि देहदान संकल्पपत्र या संस्थेकडे सुपूर्द केले असून, आता संस्थेने हे काम नि:शुल्क करण्याचा निर्धार केला आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला साधारण वर्षाला ३०-४० देह अभ्यासासाठी आवश्यक असतात. देहदात्यांमार्फत दरवर्षी अंदाजे २५ ते ३० देह उपलब्ध होत असतात. मात्र ते पुरेसे ठरत नाहीत. देहदानाबद्दल जनजागृती आवश्यक असून, मरणोत्तर आपला देह सत्कारणी लागावा या हेतूने लोकांनी आपले देहदानाचे संकल्पपत्र भरावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.जगातील ३ कोटींपैकी २० टक्के म्हणजेच ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील १ लाख ५० हजार नेत्रदानाअभावी अंध आहेत. यात दरवर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत आहे. प्रतिवर्षी फक्त ५० हजार नेत्रदान होते तर दीड लाख कॉर्नियाची भारताला गरज आहे. या अंधांना कॉर्निया उपलब्ध झाले तर त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होईल; म्हणून लोकांनी नेत्रदान करावे, असेही आवाहन संस्थेने केले आहे.