Join us
Daily Top 2Weekly Top 5

वादातून पुरुषाला फेकले रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:28 IST

मुलुंड स्थानकावरील फलाट क्रमांक ३वर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दीपक पटवा हे अजित शहा यांच्यासोबत प्रवासासाठी जात होते.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकाच्या फलाटावर झालेल्या शाब्दिक वादातून एका अज्ञात तरुणाने प्रवाशाला रेल्वे रुळावर ढकलल्याने त्याचा लोकलखाली चिरडून जागीच मृत्यू होण्याची घटना शनिवारी घडली. दीपक पटवा (५६) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी सोमवारी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमाने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.मुलुंड स्थानकावरील फलाट क्रमांक ३वर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दीपक पटवा हे अजित शहा यांच्यासोबत प्रवासासाठी जात होते. या वेळी फलाटावर असलेल्या तरुणाशी दीपक यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्या तरुणासोबत एक महिलाही होती. त्या तरुणाने रागाच्या भरात दीपक यांना धक्का मारून रुळावर ढकलले. यामुळे रुळावर येत असलेल्या लोकलखाली चिरडून दीपक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजित शहा यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलुंड स्थानकाच्या फलाट क्रमांक ३वरील सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने संशयित तरुण व महिलेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सीसीटीव्हीने शोधमुलुंड स्थानकाच्या फलाट क्रमांक ३वरील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने संशयित तरुण व महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :लोकल