Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालवणीत ५० ते ६० जणांच्या टोळक्यांची दुचाकीवर हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:06 IST

व्हायरल व्हिडिओमुळे प्रकार उघडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात शुक्रवारी रात्री ५० ते ६० जणांचे टोळके ...

व्हायरल व्हिडिओमुळे प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात शुक्रवारी रात्री ५० ते ६० जणांचे टोळके दुचाकीवर हुल्लडबाजी करताना आढळून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा त्यांना विसर पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री ५० ते ६० जणांचा एक गेट अब्दुल हमीद मार्ग गेट क्रमांक १ याठिकाणी दुचाकी आणि चार चाकी घेऊन रस्त्यावर आरडाओरड करत फिरताना दिसला.

यातील कोणीच मास्क परिधान केले नव्हते तसेच फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता ते वेगाने गाड्या पळवत होते. त्यामुळे एखादी रॅली जात असल्याचा भास होत होता, मात्र यात मालवणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचादेखील समावेश होता जे नुकतेच जामिनावर बाहेर पडलेले आहेत. याबाबत मालवणी पोलिसांना विचारले असता टोळक्यावर गुन्हा दाखल करत अद्याप पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे सांगितले.