मुंबई : मेळघाटसह इतर कुपोषण प्रभावित भागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़
कुपोषित भागांमध्ये औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याने तेथील कुपोषित बालकांचा मृत्यू होतो़ हे टाळण्यासाठी तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी व कुपोषण रोखण्यासाठी येथे विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकत्र्या पूर्णिमा उपाध्याय यांनी दाखल केली आह़े
या याचिकेवर न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात उपाध्याय यांनी कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती न्यायालयात सादर केली़ गेल्या पाच महिन्यांत मेळघाटमधील दोन कुपोषित भागांत 123 जणांचा मृत्यू झाला तर अमरावतीतील कुपोषित भागांत 113 जणांचा मृत्यू झाला़ तसेच कुपोषण रोखण्यासाठी स्थापन झालेल्या कोअर कमिटीने दर महिन्याला बैठक घेणो बंधनकारक असतानाही मार्च महिन्यानंतर या कमिटीची एकदादेखील बैठक झाली नसल्याचे उपाध्याय यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने या समितीला तत्काळ बैठक घेण्याचे आदेश दिल़े मुख्य सचिव इतर कामात व्यस्त असल्यास महिला व बाल कल्याण विभागाच्या सचिवांनी ही बैठक आयोजित करावी़ कुपोषित भागांमध्ये तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून येथील महिला व मुलींना आरोग्याची काळजी घेण्याचे धडे द्यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आह़े यावरील सुनावणी दोन आठवडय़ांनी आह़े (प्रतिनिधी)
च्गेल्या पाच महिन्यांत मेळघाटमधील दोन कुपोषित भागांत 123 जणांचा मृत्यू झाला तर अमरावतीतील कुपोषित भागांत 113 जणांचा मृत्यू झाला़.
च्कुपोषित भागांमध्ये तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून येथील महिला व मुलींना आरोग्याची काळजी घेण्याचे धडे द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटल़े