Join us

मालाड येथील हक्काचे मैदान खाजगी विकासकाच्या घशात घालण्याचा घाट!

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 27, 2024 17:06 IST

निष्क्रिय महापालिका अधिकाऱ्यांचा मनसेकडून शाल श्रीफळ देऊन केला सत्कार!

मुंबई  - महापालिका मैदानातून अवजड वाहने ये जा करू लागल्याने स्थानिक नागरिकांनी मनसे विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांच्याकडे या बाबत तक्रार केली. त्यामी ही बाब प्रमुख अभियंता विकास नियोजन, इमारत प्रस्ताव विभाग पश्चिम उपनगरे, पी उत्तर विभाग, उद्यान विभाग यांच्याशी संपर्क साधून मालाड पश्चिम,लिबर्टी गार्डन समोरील चाचा नेहरू मैदानाचे प्रवेशद्वार तत्काळ बंद करून विकासकावर करावाई करण्याची मागणी केली.

सातत्याने पाठवापुरवा करून देखील यावर कारवाई न करता निष्क्रिय अधिकारी मुंबईकरांच्या हक्काचे मैदान असललेला महापालिका भुखंड बळकावण्यासाठी विकासकाला मदत करत असल्या बद्दल आज मनसे विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांनी विभागातील कार्यकर्त्यांसह व नागरिकांसह प्रमुख अभियंता विकास नियोजन सुनिल राठोड आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक पी/उत्तर योगेंद्रसिंग कच्छावा यांची भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

आधीच मुंबईकरांसाठी खुल्या आणि मोकळ्या जागा कमी आहेत. त्यात जर धनदांडग्यांनी मुंबईकरांच्या उद्यानांच्या खुल्या जागांवर डल्ला मारला तर सामान्य मुंबईकरांना जायचे कुठे हा प्रश्न उद्भवेल आणि या सामान्य मुंबईकरांच्या हक्कासाठी मनसे नेहमीच अग्रेसर असेल अशी माहिती परब यांनी दिली.यावर कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, पण मुंबईकरांच्या हक्काची जागा मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.