मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर रविवारी ब्लॉक घेण्यात आला. मुलुंड ते माटुंगादरम्यान मेन लाइनवर आणि पनवेल-नेरूळ हार्बर मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. पश्चिम रेल्वे प्रवाशांची मात्र ब्लॉकमधून सुटका झाली. शनिवारी मध्यरात्री माहीम ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी पावणेबारा ते सायंकाळी सव्वाचारपर्यंत मेगाब्लॉकमध्ये रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलची तांत्रिक कामे करण्यात आली. अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या. अप धीम्या मार्गावर जलद लोकलही धावत असल्याने लोकल पकडताना प्रवाशांची तारांबळ उडत होती. लोकल उशिराने धावत असल्याने गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागला.
मध्य रेल्वेचे मेन, हार्बर मार्ग ब्लॉक
By admin | Updated: May 4, 2015 00:04 IST