वसई : सर्वाचे लक्ष लागलेल्या माही वसईचा उद्या थाटामाटात शुभारंभ होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून अहोरात्र सुरू असलेल्या कामावर आता अखेरचा हात फिरवणो सुरू आहे. उद्या सायंकाळी 5 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसईतील पुरातन संस्कृती, जुनी घरे, आदिवासींची कुडाची घरे तसेच शेतीसाठी पूर्वी वापरण्यात येणारी अवजारे याबाबतची संपूर्ण माहिती वसईकर जनतेला देण्यात येणार आहे.
चिमाजी आप्पा मैदानाच्या विशाल जागेवर जुनी घरे, पाणी उपसणारे रहाट, वसईचा किल्ला, शेणाने लिंपलेली आदिवासींची घरे व 1क्क् वर्षापूर्वी शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे व हत्यारे यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. गेल्या 15 दिवसांपासून शेकडो कार्यकर्ते व कर्मचारी अहोरात्र या कामात जुंपले आहेत. उद्या या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असून आज सर्व कामावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर्पयत चालणा:या या प्रदर्शनाला सुमारे 3 ते 4 लाख नागरिक भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.
नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर उद्या सायंकाळी होणा:या उद्घाटन सोहळ्यास खा. संजय राऊत, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे तसेच ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आ. हितेंद्र ठाकूर व माजी नगराध्यक्ष मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून
‘माही वसई’ साकारली आहे. (प्रतिनिधी)