Join us
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा मान्सूनपूर्व कामांचा धडाका

By admin | Updated: May 8, 2014 02:45 IST

महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा धडका लावला आहे.

नवी मंुबई: महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा धडका लावला आहे. याअंतर्गत विद्युत केबल्सच्या जोडण्या तपासणे, डीपी बॉक्सची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मरचे मेन्टेनन्स तसेच विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पावसाळ्यात सदोष विद्युत वाहिन्यांमुळे अनेकदा अपघात घडतात. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. विशेषत: एमआयडीसी विभागात पावसाळ्यात विद्युत पुरवठ्याविषयी तक्रारीत वाढ होते. तसेच उपर्‍या विद्युत वाहिन्या असलेल्या झोपडपट्टी परिसरात सुध्दा पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवतात. त्यावर उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्याअगोदर ही कामे हाती घेतली जातात. महावितरणच्या वाशी आणि नेरूळ मंडळाने अलिकडेच या कामांना सुरुवात केली आहे. याअंतर्गत विद्युत ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करणे, तुटलेल्या डीपी बॉक्सची डागडुजी करणे, विद्युत वाहिन्यांच्या जोडण्या व्यवस्थित करणे तसेच विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणार्‍या वृक्षांची छाटणी करणे आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आली असून ३१ मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे महावितरणच्या वाशी परिमंडळचे कार्यकारी अभियंता एस.बी. सुरवडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)