Join us

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील ‘गोंधळा’ला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:06 IST

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील या गोंधळाला महाविकास आघाडी सरकार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याची टीका ...

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील या गोंधळाला महाविकास आघाडी सरकार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याचे महापाप या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. टक्केवारीच्या मोहापायी बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून हे असले गोंधळ घालायचे, अशी टीका त्यांनी केली.

या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ असून, परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही, अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही, प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची, असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले असल्याची कल्पना आपण स्वतः राज्य सरकारला दिली होती. परंतु त्याकडेसुद्धा कानाडोळा करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. त्यामुळे परीक्षेला अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, परीक्षा नक्की कधी घेणार याची २४ तासांच्या आत माहिती द्यावी व काळ्या यादीतील कंपनीला कोणी काम दिले याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी आग्रही मागणीसुद्धा आमदार भातखळकर यांनी केली.

-----------------/////-----------------------