Join us
Daily Top 2Weekly Top 5

महारोजगार मेळावा आता २० डिसेंबरपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:07 IST

मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन महारोजगार मेळाव्यास ...

मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हा मेळावा २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर इच्छुकांना नाेंदणी करता येईल.

.............................

कथालेखन कार्यशाळा हाेणार ऑनलाइन

मुंबई : कथा लेखनाची आवड असणाऱ्यांना उत्तम कथालेखन करता यावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीच्या वतीने पिक्शन कथालेखन कार्यशाळा जानेवारी महिन्यात ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत कथा क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील.

..........................................

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्याद्वारे जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

....................