Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीमध्ये भरली महाराष्ट्र व्यापारी पेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST

मुंबईलघू उद्योजक, महिला उद्योजिका व नुकतेच व्यापारात काही तरी करून दाखवायचे आहे, अशा तरुण उद्योजकांसाठी सर्वात मोठे व ...

मुंबई

लघू उद्योजक, महिला उद्योजिका व नुकतेच व्यापारात काही तरी करून दाखवायचे आहे, अशा तरुण उद्योजकांसाठी सर्वात मोठे व वलयांकित व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र व्यापारी पेठ. मुंबईकर ग्राहकांचे हक्काचे खरेदीचे स्थान असणारी विश्वासाची, आपुलकीची ही महाराष्ट्र व्यापारी पेठ दरवर्षी मराठी व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी मित्रमंडळ या ४० वर्षे जुन्या संस्थेतर्फे गेली ३० वर्षे दादरच्या अँटोनिया डिसिल्व्हा शाळेच्या मैदानात गणपती ते दिवाळी असे ६५ दिवस भरविण्यात येत असे; मात्र गेल्या दोन वर्षात परिस्थितीनुसार या संस्थेने ही लाडकी महाराष्ट्र व्यापारी पेठ आता अँटोनिया डिसिल्व्हा शाळेच्या पटांगणात न भरविता ग्राहकांच्या सोयीसाठी १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत १६ दिवस बोरीवली (प.), भाटिया हॉल, वीर सावरकर उद्यानासमोर भरवण्यात येणार आहे.