Join us  

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 5:39 AM

महाराष्ट्रालाच अधिक पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर १ राज्य असल्याचा दावा केला आहे. 

राज्यात एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात १ लाख ८३ हजार ९२४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली असून, परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती ही महाराष्ट्राला आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महाराष्ट्रात २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,१८,४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करून राज्य क्रमांक १ वर आले. २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२३) ३६,६३४ कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीतही (जुलै ते सप्टेंबर २०२३)  २८,८६८ कोटींची थेट परकीय गुंतवणूक करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपरकीय गुंतवणूक