Join us  

Mumbai Dabbawala: मुंबईच्या डब्बेवाल्यांनी रोजगार बुडूनही माणुसकी जपली; KEM हॉस्पिटलबाहेर केलं जेवणाचं वाटप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 7:33 PM

Mumbai Dabbawala: राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा फटका जसा रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांना बसला तसाच तो मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही बसला.

Mumbai Dabbawala: राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा फटका जसा रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांना बसला तसाच तो मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही बसला. मुंबईच्या डब्बेवाल्यांचा लॉकडाऊन काळात रोजगार बुडाला असला तरी माणुसकी धर्माला जागत डब्बेवाल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Mumbai Dabbawala distributes food outside KEM Hospital in Mumbai)

मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर गरजूंना जेवण वाटपाचं काम मुंबईच्या डब्बेवाल्यांनी केलं आहे. केईएम रुग्णालयात कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. असावेळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची हयगय होते. अनेकदा नातेवाईकांना उपाशी राहावं लागतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या डब्बेवाल्यांनी मुंबईतील तीन ते चार ठिकाणी जेवणाचं वाटप करुन रुग्णांच्या नातेवाईकांना मदत केली आहे. 

"आम्ही वैयक्तिक पातळीवर निधी जमा करून आणि आमच्या ट्रस्टच्या मदतीतून मुंबईतील तीन ते चार ठिकाणी मोफत जेवण देण्याचं काम हाती घेतलं आहे", असं मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी सांगितलं.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई