Join us

अल्पवयीन मुलींच्या हत्येत महाराष्ट्र आघाडीवर

By admin | Updated: October 12, 2015 04:50 IST

एकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

मनीषा म्हात्रे, मुंबईएकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुली वाचवा, अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.सुरक्षेबाबत शासनस्तरावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ‘मुलगी नको, वंशाचा दिवा हवा, म्हणून मुलींची गर्भाशयातच हत्या केली जात होती. यामुळे मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असताना, शासनाने यावर कडक भूमिका घेतल्याने त्यावर रोख आणणे शक्य झाले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, ६ वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक ६२ हत्या महाराष्ट्रात झाल्या. या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (३४), उत्तर प्रदेश (२७), मध्य प्रदेश (२६) यांचा क्रमांक आहे.