Join us  

'फिर एक बार... पोरांपेक्षा पोरीच ठरल्या हुश्शार'; तरुणाई कसा करते मुलींच्या यशाचा विचार!

By सायली शिर्के | Published: May 29, 2019 4:43 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. बारावीच्या परीक्षेत मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या.

साधारण 20 ते 25 वर्षांपूर्वी मुलगी म्हटलं की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकायचा. मुलीचं शिक्षण, लग्न, संसार याची चिंता सतत त्यांना भेडसावत राहायची पण जस जसे दिवस सरले काळासोबत माणसांनी ही विचारांचं जुनं घोंगडं थोडं मागे सारलं. स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी होऊन कोवळ्या कळ्यांना फुलण्याची, स्वच्छंदी बागडण्याची संधी दिली. पहिली बेटी धनाची पेटी, माझी लेक भाग्यलक्ष्मी, मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणत समाजाने मायेची फुंकर घातली आणि आता याच मुली आईवडिलांचा सन्मान झाल्या आहेत. 

सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली झाली. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. बारावीच्या परीक्षेत मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या. परीक्षेमध्ये मुलांपेक्षा नेहमी मुलीच का पुढे असतात?, मुली खरंच जास्त अभ्यास करतात का?, मुलींनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तरुणाईला काय वाटतं हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत... 

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारावीच्या निकालामध्ये मुलींनीच आम्ही फस्ट आणि बेस्ट आहोत हे दाखवून दिलं. मुलं आणि मुली समसमान आहोत असं फक्त म्हटलं जातं पण प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा त्यांना मुलगी आहे म्हणून चुकीचं ठरवलं जातं. मात्र मुली नेहमीच त्या ग्रेट असल्याचं दाखवून देतात. मुलींना मिळालेल्या या घवघवीत यशाचं नक्कीच कौतुक आहे. 

- आकाश शिरसट

 

खरंतर मुली मुलांपेक्षा अधिक शिस्तप्रिय असतात. तसेच शिक्षक शिकवताना त्या नीट काळजीपूर्वक लक्ष देतात. मुलं देखील अभ्यास करतात पण ते फक्त परीक्षा जवळ आल्यावरच पुस्तक वाचतात. पण मुली नियमितपणे रोज अभ्यास करतात. त्यामुळेच नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारण्याची परंपरा कायम आहे.  

- संगीता अहिरवार

 

दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के

 

आजच्या मुलींना स्वत: च्या पायावर उभं राहून नेहमी स्पर्धेच्या जगात स्वत: ला टिकवून ठेवायला आवडतं. त्यामुळे मुली नेहमीच प्रत्येक गोष्टीत अ‍ॅक्टिव्ह असतात. तसेच त्याचं ध्येय गाठण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. त्यामुळेच त्या अभ्यासात आणि एकंदरीत सर्वच गोष्टीत मुलांच्या पुढे असतात. 

- किरण चिंचवले

आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के

 

प्रत्येक घरात मुलांसोबत मुलींना प्राधान्य दिलं जातं आणि त्याचा पुरेपूर उपयोग मुली करून घेत आहेत. शिक्षणातही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व क्षेत्रात त्यांनी स्वतः चं कर्तृत्त्व सिद्ध केलं आहे. खेळासोबतचं मुली मोठ्या पदावर आपली जबाबदारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलीचं सरस ठरल्या आहेत. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी मुली मेहनत घेत आहेत. सध्याच्या काळात बऱ्याच योजना मुलींसाठी सरकार राबवत आहेत त्याचा फायदा मुलींना घ्यावा.

- वैशाली आसोलकर

 

कर्णबधीर पायलला बारावीत ८०.३० टक्के

 

मुलींनी यंदा निकालात बाजी मारली आहे. पण मुलं देखील अभ्यास करतात. पण ते अभ्यासाचं फारसं टेन्शन घेत नाहीत. जास्त विचार करत बसत नाहीत. याउलट मुली चांगले मार्क मिळावे, नोकरी मिळावी या उद्देशाने अभ्यास करतात. त्यामुळेच त्यांना परीक्षेत यश मिळतं.

- सचिन भोसले

 

सिमरनने सार्थ ठरवला पालकांचा विश्वास

 

मला वाटते की आता मुलींनी स्वतः च्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे.  नोकरी, घर सांभाळून त्या स्वतः चे ध्येय यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टीची प्रामाणिकपणे जाणीव आहे. म्हणून त्या सर्व क्षेत्रात पुढे आहेत. अभ्यास हा मुली नेहमीच मन लावून करतात. त्यामुळे यश त्यांना आपोआपचं मिळतं. 

- श्रद्धा सैंदाणे  

टॅग्स :बारावी निकालमहिलापरीक्षापरिणाम दिवस