Join us  

Maharashtra Government: मैं समंदर हूँ लौटकर आऊंगा - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 5:39 AM

मुंबई : मेरा पानी उतरता देख,मेरे किनारे पर घर मत बसा लेनामै समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा...

मुंबई : मेरा पानी उतरता देख,मेरे किनारे पर घर मत बसा लेनामै समंदर हूँ लौटकर वापस आऊंगाया ओळी म्हणत ‘मी परत येईन’ असे म्हणालो होतो पण टाईमटेबल दिले नव्हते. वाट पहा. राजकारणात आता काहीही अशक्य राहिलेले नाही, असे प्रत्युत्तर नवे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह सत्तापक्षाच्या नेत्यांनी मारलेल्या कोपरखळ्यांना विधानसभेत दिले.आपल्या अभिनंदन प्रस्तावावर आभार व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, आम्हाला १०५ जागा मिळाल्या; आम्ही मेरिटमध्ये आलो. पण लोकशाहीत गणित मांडले जाते. तीन पक्षांनी आपले गणित मांडले. ‘मी पुन्हा येईन’ हे मी म्हटले होते. जनादेशही तोच होता. पण जनादेशाचा सन्मान केला गेला नाही, त्याला आम्ही काय करणार? कालपर्यंत जे मित्र होते आज ते एकमेकांसमोर आहेत.उद्धव ठाकरे यांना मी कालच्या गोंधळात शुभेच्छा देऊ शकलो नाही. पण मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. जनतेच्या इच्छा आकांक्षा आणि त्यांच्या मनात जनतेसाठी जे काही करायचे आहे त्याच्या पूर्ततेसाठी जे जे जनहिताचे असेल त्यास विरोधी पक्ष म्हणून आमचे संपूर्ण सहकार्य असेल, कधीही आवाज द्या, असे फडणवीस हे ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. राज्याची अशी एकही समस्या नाही की, जी घटनेच्या चौकटीत सोडविली जाऊ शकत नाही. मी देखील नियम आणि घटनेच्या चौकटीबाहेर कधीही जाणार नाही. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू असे कोणी समजू नये. वैचारिक विरोध असू शकतो पण कोणाची वैयक्तिक बदनामी मी विनापुरावा करणार नाही. सभागृहाची प्रतिष्ठा राखेन, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.वेगळा अर्थ काढलाशनिवारी सभागृहात बोलताना मी महापुरुषांची नावे मंत्र्यांनी शपथविधीत घेण्यास विरोध दर्शविला नव्हता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या घटनेत शपथेचे स्वरुप कसे आहे तेवढेच मी सांगितले, पण त्याचा वेगळा अन्वयार्थ काढला गेला आणि एखाद्या विधानाला वेगळा रंग देण्याची जयंत पाटील यांची हातोटीच आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस