Join us  

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर, महाराष्ट्र मात देतोय कोरोनावर

By महेश गलांडे | Published: November 02, 2020 10:59 PM

राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे.

ठळक मुद्देराज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे.

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे, रुग्णांच्या संख्येने 81 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 82 लाखांच्याजवळपास पोहोचला आहे. आतापर्यंत देशभरात तब्बल 1,22,111 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 लाखांच्या घरात पोहोचली आहे. आज 4,009 कोरोनाचे आढळले असून तब्बल 10,225 जणांनी कोरोनावर मात करुन आपलं घर गाठलं आहे. 

राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज 10,225 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 15,24,304 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.31 % एवढे झाले आहे.

आज राज्यात 4009नवीन रुग्णांचे निदान.राज्यात आज 104 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,87,784 (18.62 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,33,780 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12,195 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

टॅग्स :राजेश टोपेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र