Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटी कायदा समर्थनार्थ महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 07:06 IST

अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करू नये, म्हणून एससी, एसटी आणि ओबीसी समज बांधवांनी नांदेडमध्ये १६ आॅक्टोबरला महामोर्चाची हाक

मुंबई : अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करू नये, म्हणून एससी, एसटी आणि ओबीसी समज बांधवांनी नांदेडमध्ये १६ आॅक्टोबरला महामोर्चाची हाक दिली आहे. मात्र हे मोर्चे मराठा क्रांती मूक मोर्चाविरोधात किंवा प्रतिमोर्चा नसल्याचे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले आहे.सदावर्ते म्हणाले की, आंबेडकरी समाजाच्या सर्व नेत्यांनी समाजाला आवाहन करायला हवे. केवळ अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या समर्थनार्थ हा महामोर्चा असल्याचे सर्व नेत्यांनी जाहीर करायला हवे. जेणेकरून समाजातील शांतता कायम राहील. सुमारे ५ लाख लोक या महामोर्चात सामील होतील, असा अंदाज सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी महामोर्चात सामील व्हावे, असे आवाहन सदावर्ते यांनी केले आहे. (प्रतिनिधी)