Join us  

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:34 AM

मागील वर्षी मध्य रेल्वेवरील १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात असून, या वर्षी आता नव्या ३० स्थानकांवर लवकरच मशिनद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे.

मुंबई : मागील वर्षी मध्य रेल्वेवरील १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात असून, या वर्षी आता नव्या ३० स्थानकांवर लवकरच मशिनद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, इगतपुरी, लोणावळा या स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात आहे. या वर्षात लवकरच नवीन ३० स्थानकांत मशिनद्वारे स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. अती गर्दीसह अस्वच्छतेच्या स्थानकांवर लवकरच या सुविधेची सुरुवात करण्यात येणार आहे.दरम्यान, गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार भारतीय रेल्वे मार्गावरील दहा अस्वच्छ स्थानकांमध्ये कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या स्थानकांचा क्रमांक लागतो. कानपूर स्थानक अस्वच्छतेच्या यादीत प्रथम क्रमांकावर असून, कल्याण तिसऱ्या क्रमांकावर, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या आणि ठाणे आठव्या क्रमांकावर आहे. या स्थानकावर मशिनद्वारे साफसफाई केल्यास ही स्थानके स्वच्छ होण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाºयांना आहे.

टॅग्स :मुंबई