Join us

म. रे. २४ तास विस्कळीत राहणार

By admin | Updated: October 6, 2015 02:46 IST

१३५ वर्ष जुना असलेल्या भायखळ््याजवळील हँकॉक ब्रीजचे काम रेल्वेकडून लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडून नियोजन सुरु असून

मुंबई : १३५ वर्ष जुना असलेल्या भायखळ््याजवळील हँकॉक ब्रीजचे काम रेल्वेकडून लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडून नियोजन सुरु असून विशेष ब्लॉक घेवून या पुलाचे काम करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. हा निर्णय रेल्वे आणि पालिकेतर्फे घेण्यात आला असून यात मध्य रेल्वेकडूनच सर्वाधिक काम केले जाणार असून पालिकेकडून काही प्रमाणात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मेन लाईनवर लोकल भायखळ््यापासून डाऊन दिशेला तर हार्बरवरील लोकल या वडाळा आणि कुर्ल्यापासून चालविण्यात येतील. मेल-एक्सप्रेस गाड्या या दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपासून चालवण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या कामासाठी अजून तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. या कामासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यांची मंजुरी येताच आमच्याकडूनही काही सोपस्कार पार पाडले जातील. या महिन्यात नवरात्रोत्सव आणि नोव्हेंबर महिन्यात येणारी दिवाळी यामुळे हे काम बहुतेक दिवाळीनंतरच घेतले जाण्याची शक्यता असल्याचे हा अधिकारी म्हणाला. दरम्यान, या कामामुळे रस्ते वाहतूकीवरही परिणाम होणार असल्यामुळे यात ट्रॅफिक पोलिसांची आणि बेस्टची मदत घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)