Join us

महिलांच्या सुरक्षेला एम इंडिकेटर

By admin | Updated: August 7, 2014 01:53 IST

लोकलमधून प्रवास करणा:या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून या सुरक्षेत सुधारणा होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता.

मुंबई : लोकलमधून प्रवास करणा:या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून या सुरक्षेत सुधारणा होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप्लिकेशन सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. एम इंडिकेटरव्दारे ही सेवा देण्यात येणार असून साधारण एका महिन्यात ती उपलब्ध करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाकडून केला जाणार आहे. रेल्वे पोलिस दलाकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेविषयी जनजागृतीबाबत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.  
लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे चोरीच्या उद्देशाने महिला प्रवाशांवर हल्ले करताना त्यांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यांच्यावरील सुरक्षेची जबाबदारी प्रत्यक्षात जीआरपीवर (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) आहे. मात्र संख्याबळ कमी पडत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचीही (आरपीएफ) मदत घ्यावी लागत आहे. महिला प्रवाशांवर होणारे वाढते हल्ले पाहता आता पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने एम इंडिकेटरसारख्या अॅप्लिकेशनव्दारे महिला प्रवाशांची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅप्लिकेशनव्दारे एक ‘आपत्कालीन’ बटन उपलब्ध केले जाणार असून ते रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाशी जोडलेले असेल, असे रेल्वे सुरक्षा दलाचे (पश्चिम) महानिरीक्षक डी.बी. कासार यांनी सांगितले. एखाद्या महिला प्रवाशाला प्रवासात कुठल्याही व्यक्तीकडून धोका असल्याचे संभवताच किंवा भीती वाटताच त्या महिला प्रवाशाकडून हे बटण दाबले जाईल आणि त्यानंतर त्याची माहिती आम्हाला मिळेल. महिला प्रवाशाने कुठर्पयत प्रवास केला आहे किंवा ती महिला प्रवासी कुठे आहे त्याची माहितीही याव्दारे मिळेल आणि त्या महिला प्रवाशाला तात्काळ रेल्वे पोलिसांकडून मदत दिली जाईल, असे कासार यांनी सांगितले. एक महिन्यात ही सुविधा आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
 
एम इंडिकेटरच्या सहकार्याने ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणोच मध्य रेल्वेवरही ही सुविधा असेल. 
 
एम इंडिकेटरवर सध्या पश्चिम, मध्य रेल्वेच्या ट्रेनचे वेळापत्रकाबरोबरच बस तसेच टॅक्सी आणि रिक्षा सेवांबद्दलही माहिती देण्यात येते.