कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी जवळ सोमटा येथे सनी ट्रॅव्हलर्सची लक्झरी उलटल्याने १० प्रवासी जखमी झालेत. त्यापैकी तुषार जैन, ममता चारणीया, दक्षा चारणीया या तिघांची प्रकृती गंभीर आहे.मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरीच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती डिव्हायडरवर आदळून उलटली. तिच्यात ७० प्रवासी होते. त्यापैकी १० जण जखमी, काहींना किरकोळ मार लागला आहे. तर ३ गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना कासा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली असून कासा पोलीसांनी मदतकार्य सुरू करून लक्झरीतील जखमींना दवाखान्यात दाखल केले. लक्झरी महामार्गावरून दूर करण्यात आली. यामुळे वाहतुकीची एक ते दोन तास कोंडी झाली होती. उलटली तरी ती जात असलेल्या महामार्गावरच पलटल्याने बरेचसे प्रवासी बचावले. परंतु, ही लक्झरी मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर जाऊन पडली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अशा प्रकारचे सतत अपघात होत असून धोकादायक मार्ग व वळणाच्या ठिकाणी सूचनाफलक न लावल्याने अपघात घडत असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे.
महामार्गावर लक्झरी उलटली
By admin | Updated: January 21, 2015 22:47 IST