Join us  

लक्झरी बसबंदीवरून गोंधळ, मुंबईत दिवसा बंदी; बसमालकांचा कोर्टात जाण्याचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 5:16 AM

शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी अवजड वाहने आणि खासगी आरामबसला दिवसा प्रवेश बंद करण्याच्या वाहतूक शाखेच्या आदेशाला मुंबई बस चालक-मालक संघटनेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे बसचालकांचे वेळापत्रक कोलमडल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. हा निर्णय रद्द करण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून तोडगा न निघाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा बसमालकांच्या संघटनेने दिला आहे.

मुंबई : शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी अवजड वाहने आणि खासगी आरामबसला दिवसा प्रवेश बंद करण्याच्या वाहतूक शाखेच्या आदेशाला मुंबई बस चालक-मालक संघटनेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे बसचालकांचे वेळापत्रक कोलमडल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. हा निर्णय रद्द करण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून तोडगा न निघाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा बसमालकांच्या संघटनेने दिला आहे.वाहतूक पोलिसांनीमंगळवारपासून खासगी बसला सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत प्रवेश बंदी केली आहे. दोन महिने प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी होईल. बुधवारी यातून वाहतूक पोलीस व बसचालकांचे अनेक ठिकाणी वाद झाले.रस्त्यावर खासगी बसला साधारणपणे ४५० स्क्वेअर फूट जागा लागते. टॅक्सी किंवा कार सुमारे १५० स्क्वेअर फूट इतकी जागा घेते. बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करतात. मात्र गर्दीच्या वेळेत त्यातून ७० जणांची वाहतूक केली जाते. त्याच्या तुलनेत कार वा टॅक्सीमधून केवळ चौघे प्रवास करतात. खासगी बसला बंदी घातल्यास त्याचा उलटा परिणाम होईल. मुंबईतून बाहेर गावी जाणाºया लक्झरी बस दक्षिण मुंबईतून रात्री १२ नंतर बाहेर सोडल्यास त्या वाशी, पनवेलपर्यंत पोहचण्यास मध्यरात्र होईल.विश्वासात न घेता परस्पर निर्णयशहरातील खासगी बसची संख्या साधारणपणे ३२५ ते ३५० आहे. या बसमधून केवळ मुंबई नव्हे अन्य उपनगरांतून देखील प्रवासी प्रवास करतात. शहरात सुमारे २.५ लाख ओला-उबर या सारख्या टॅक्सींची नोंदणी आहे. परिणामी वाहतूक कोंडीच्या दृष्टीने या वाहनांची नोंदणी करताना संबंधितांनी आक्षेप घेणे गरजेचे होते. लक्झरी बस व अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करण्यापूर्वी पोलिसांनी विश्वासात घेऊन चर्चा करावयास हवी होती.- मलिक पटेल, सचिव, मुंबई बस चालक-मालक संघटनावाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयोगात्मक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे. ६० दिवसांच्या मुदतीत या आदेशावर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. खासगी बसचा प्रवेश बंदीचा निर्णय मागे घ्यायचा की कायमस्वरुपी लागू करायचा हे प्रवाशांच्या हरकती व सूचनेनूसार ठरविण्यात येईल.- अमितेश कुमार, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुखवाहतूक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी काढलेला आदेश :अ) बृहन्मुंबई कार्यक्षेत्रासाठी(दक्षिण मुंबई वगळून)मुंबई शहरात बाहेरून येणाºया व जाणाºया अवजड वाहनांना व प्रवासी वाहतूक करणाºया सर्व खासगी बसला सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर धावण्यास बंदी.ब) दक्षिण मुंबई कार्यक्षेत्रासाठीअवजड वाहने आणि प्रवासी वाहतूक करणाºया सर्व प्रकारच्या खासगी बसला दक्षिण मुंबईत प्रवेश करण्यास आणि रस्त्यावर धावण्यास सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंदी आहे. रात्री १२.०१ मिनिट ते ६.५९ वाजेपर्यंत दक्षिण मुंबई जाण्यास प्रवेश राहील.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारमुंबई