Join us

रेशनिंगरील धान्याच्या आमिषाने वृद्धेला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:07 IST

मुंबई : रेशनिंग धान्य देण्याचे आमिष दाखवत दोन ठगांनी ६१ वर्षीय वृद्धेला लुटल्याची घटना डोंगरीमध्ये घडली. तक्रारदार या ...

मुंबई : रेशनिंग धान्य देण्याचे आमिष दाखवत दोन ठगांनी ६१ वर्षीय वृद्धेला लुटल्याची घटना डोंगरीमध्ये घडली. तक्रारदार या मीरा रोड येथील रहिवासी असून, १९ डिसेंबर रोजी जे.जे. रुग्णालयात उपचार घेत सॅन्डहर्स्ट रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना, ही घटना घडली. डोंगरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

.............................

अँटॉप हिल येथून १२ लाखांचा गुटखा जप्त

मुंबई : अँटॉप हिल येथून १२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. एफडीएने २१ डिसेंबर रोजी ही कारवाई केली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.......................................

तरुणीसोबत अश्लील वर्तन करणारा अटकेत

मुंबई : उपचाराच्या बहाण्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या मुकेश प्रजापती नावाच्या वॉर्डबॉयला दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

...

लुटीच्या बहाण्याने आलेल्या त्रिकुटाला अटक

मुंबई : वडाळा पेट्रोल पंपावर लुटीच्या बहाण्याने आलेल्या त्रिकुटाला वडाळा टी टी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नौशाद शेख (३४), अमीर इद्रसी (२६), वसीम इद्रसी (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

....