Join us  

कोरोनाकाळात राज्यात पहिल्यांदा फुप्फुस, यकृत प्रत्यारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 5:36 AM

७४ वर्षांच्या ज्येष्ठामुळे मिळाले दोघांना जीवदान

मुंबई : कोविडच्या परिस्थितीतील राज्यात पहिले फुप्फुस व यकृत प्रत्यारोपण नुकतेच यशस्वी पार पडले. यात ७४ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाने दोघांना अवयवदान करून जीवदान दिले. घरातच पडल्यामुळे ७४ वर्षीय रुग्णाला ३० जुलै रोजी रुग्णालयात दाखल केले होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना ब्रेनडेड घोषित केले. डॉक्टरांनी अवयवदानासाठी कुटुंबाची संमती घेतली. त्यानंतर दोन रुग्णांवर फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालयाचे क्रिटिकेअर विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बोराडे यांनी दिलीे.

मुंबई जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीचे डॉ. भरत शहा म्हणाले, ७४ वर्षीय रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा विकार असल्याने रुग्ण दोन वर्षांपासून डायलिसिसवर होता. या रुग्णाचे फुप्फुस व यकृत अवयवदानासाठी योग्य स्थितीत होते. तर मूत्रपिंड निकामी झाले होते. मुंबईत फुप्फुस प्रत्यारोपणासाठी योग्य रुग्ण न सापडल्याने चेन्नईच्या प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय रुग्णाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर चेन्नईला विशेष विमानसेवेद्वारे शस्त्रक्रियेसाठी फुप्फुस पाठविण्यात आले. चेन्नई व राज्यातील चमूने या अवयवदानासाठी विशेष साहाय्य केले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या