Join us  

फुप्फुस तपासणी १६ सेकंदात, बीकेसी सेंटरमध्ये अनोखी सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 9:52 AM

कोरोना रुग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी सीटी इन ए बॉक्स ही अनोखी सुविधा आहे. देशातील हे पहिले मेड इन इंडिया सीटी मशीन आहे. ज्यात फुप्फुसाची तपासणी केवळ १६ सेकंदात होऊ शकते.

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर सर्वात मोठे कोविड सेंटर स्थापन केले आहे.  सेंटरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठीची अनोखी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; याअंतर्गत सीटी इन ए बॉक्स देण्यात येत आहे. ही सुविधा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी सीटी इन ए बॉक्स ही अनोखी सुविधा आहे. देशातील हे पहिले मेड इन इंडिया सीटी मशीन आहे. ज्यात फुप्फुसाची तपासणी केवळ १६ सेकंदात होऊ शकते. आणीबाणीच्या काळात पेशंट स्कॅन मोड सुविधा आहे. या संयुक्त सीएसआर प्रयत्नास काही स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले आहे.  नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  आपले प्रयत्न अधिक बळकट होतील.  ही सुविधा सामाजिक अंतराची आवश्यकता लक्षात घेऊन सुरक्षित, वेगळ्या वातावरणामध्ये कोरोना रुग्णांना उत्कृष्ट निदान सुविधांची उपलब्धता करण्यास मदत करते.

सीटी इन अ बॉक्स म्हणजे काय?- सीटी इन ए बॉक्स ही अभिनव सुविधा आहे.- यामध्ये कोरोनासारख्या साथरोगांमध्ये आवश्यक वेगळ्या सीटी स्कॅनची आवश्यकता पूर्ण होते.- सीटी डायग्नोस्टिक सोल्युशन प्रदान केले जाते.- याचे दोन भाग आहेत.- पहिला म्हणजे कोरोना संशयित रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी सीटी मशीन- दुसरा म्हणजे एक इन्सुलेटेड बॉक्स त्यात आहे.  हा बॉक्स सुरक्षाविषयक सुविधा आणि मदतीसह विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेला आहे. यामुळे दुय्यम संसर्ग होत नाही आणि शारीरिक संपर्क होणार 

आणीबाणीच्या काळात पेशंट स्कॅन मोड सुविधा आहे. या संयुक्त सीएसआर प्रयत्नास काही स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले  आहे.  

बीकेसी कोविड केअर सेंटरने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. स्वत:ला देशातील सर्वोत्कृष्ट कोविड केअर सुविधा म्हणून सिद्ध केले आहे. कोरोनासारख्या अत्यंत कठीण संकट काळात हे सेंटर बांधण्यात आले. सीएसआरअंतर्गत सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करत आहोत. ही सेवा कोविड रुग्णांसाठी विनामूल्य असेल.    - आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉस्पिटलडॉक्टर