Join us  

Lower Parel Bridge Closed : लोअर परळचा रेल्वे पूल आजपासून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 9:04 AM

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था

मुंबई - अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने आता लोअर परळचा रेल्वे पूल धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळेच हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलैपासून दुरुस्तीपर्यंत बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून पूल बंद असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.  

अंधेरी दुर्घटनेनंतरच्या जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने काही पुलांची पाहणी केली असून या पाहणीत रेल्वे रूळांवरून गेलेल्या लोअर परळसह एकूण सहा उड्डाणपुलांची तातडीने पुनर्बाधणी किंवा दुरुस्तीची गरज आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यापैकी लोअर परळ स्थानकासमोरील ना. म. जोशी मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या. मंगळवारी  ६ वाजल्यापासून या पुलाशी जोडलेले रस्ते आणि उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा पूल बंद केल्यानंतर या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पुल लालबागच्या दिशेने आणि ना. म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

तसेच फिनिक्स मॉल आणि कमला मिल कंपाऊंडसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल प्रभादेवी रेल्वे स्थानकापासून गणपतराव कदम मार्गे वरळी नाका हा मार्ग सुरूच असेल अशी माहिती दुधे यांनी दिली. करी रोड सिग्नलपासून ते वडाचा नाका (दीपक सिनेमाकडे जाणार मार्ग) आणि वरळीच्या दिशेने जाणार जोड पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहे. दरम्यान या पुलाच्या खालूनच रेल्वे लोकल जाते. लोअर परळ पुलाखाली असलेल्या भाजी मार्केटमधून पर्यायी मार्ग सुरु करण्यात येईल. तसेच लोअर परळ रेल्वे स्थानकात करी रोडहून जाण्यासाठी ना. म. जोशी पुलाखाली डाव्या बाजूला नव्याने सुरु केलेल्या पुलाचा वापर करू शकतात असे ते पुढे म्हणाले.

सकाळी 10 वाजता - 

टॅग्स :लोअर परेलमुंबईप्रभादेवी