Join us

‘विद्याथ्र्याच्या गुणांवर प्रेम करा’

By admin | Updated: August 24, 2014 00:52 IST

शिक्षकांनी विद्याथ्र्यावर प्रेम करून त्यांच्या गुणांना वाव दिल्यास त्यांचा सर्वच क्षेत्रंत विकास होईल, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.

मुलुंड : शिक्षकांनी विद्याथ्र्यावर प्रेम करून त्यांच्या गुणांना वाव दिल्यास त्यांचा सर्वच क्षेत्रंत विकास होईल, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.
मुलुंड कालिदास नाटय़गृह येथे गुरुवारी आयोजित विद्याथ्र्याच्या सत्कार सोहळ्यादरम्यान बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते  ‘मराठमोळं मुलुंड’ या संस्थेचीही मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शिवाय दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यानाही गौरविण्यात आले. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, सध्याची मुले वाचत नाहीत ही खंत आहे. विद्याथ्र्याची यशस्वी जडणघडण होण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणो गरजेचे आहे, जेणोकरून त्यांचा विकास होण्यास मदत होईल. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरणात सुरू असलेल्या पक्षबदलावर तत्त्वनिष्ठा उरली नसल्याचे त्यांनी आवजरून नमूद केले. शिवाय माङयातला ‘मी’पणा व्याकरणासाठी आहे, अहंकारासाठी नाही. त्यामुळे सर्व पक्षांत माङो मित्र आहेत, असेही ते म्हणाले.
मुलुंडमधील विविध क्षेत्रंतील मान्यवरांना आणि सुजाण, सुज्ञान मुलुंडकरांना एकत्रित करून मराठी अस्मिता जपणो ही काळाची गरज आहे. भावी पिढीला  मार्गदर्शन करण्यासाठी ‘मराठमोळं मुलुंड’ या संस्थेची स्थापना केली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)