Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्यांना मिळणार प्रेमाचा पुरस्कार

By admin | Updated: March 5, 2016 02:23 IST

सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लोकमत’ सखी मंच विविध उपक्रमांचे आयोजन नेहमीच करीत असते. यंदा कलर्स वाहिनी व ‘लोकमत’ सखी मंचने ‘प्रेम’ हा विषय घेऊन ‘जोडी जन्मोजन्मांची,

मुंबई : सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लोकमत’ सखी मंच विविध उपक्रमांचे आयोजन नेहमीच करीत असते. यंदा कलर्स वाहिनी व ‘लोकमत’ सखी मंचने ‘प्रेम’ हा विषय घेऊन ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची’ या धम्माल स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्यात पती-पत्नीच्या प्रेमाची कसोटी लागणार आहे.कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंचतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांना महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महिलांचा हाच उत्साह लक्षात घेत यंदा ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची’ ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत तीन वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जाणार असून, पहिली स्पर्धा ‘बेस्ट जोडी’ (गीत)आहे. यात पुनर्जन्मावर आधारित कोणत्याही चित्रपटातील गाणे पती-पत्नी यांनी मिळून सादर करायचे आहे. दुसरी स्पर्धा असेल ‘बेस्ट जोडी’ (अभिनय) यात पुनर्जन्मावर आधारित कुठल्याही चित्रपटातील संवाद अथवा प्रसंग पती-पत्नी यांनी सादर करायचा आहे. तिसरी स्पर्धा असेल ‘बेस्ट जोडी ’(कविता). यात पुनर्जन्मावर आधारित स्वरचित कविता दोघांनी मिळून सादर करायची आहे. आहे की नाही कसोटी..! स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक आणि स्पर्धेच्या शीर्षकाने सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धांसाठी केवळ १० जोडप्यांनाच संधी मिळणार असून, यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दहाहून अधिक जोडपी असल्यास प्राथमिक फेरी घेण्यात येईल आणि त्यातून अंतिम स्पर्धक निवडले जातील.शिवाय कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटायला आलेल्या प्रेक्षक सखींसाठी ‘बॉलीवूड जोडी’ ही मनोरंजक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात चित्रपटातील जोडप्यांची वेशभूषा करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे यात पती-पत्नी यांनी सहभागी होणे बंधनकारक नाही. तर दोन सखी किंवा बहीण-भाऊही यात सहभागी होऊ शकतात. यातील बेस्ट जोडप्यांना ‘बॉलीवूड जोडी’ने सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)