Join us

टॅक्सी परवान्यांचे आज लॉटरी वाटप

By admin | Updated: November 29, 2014 00:27 IST

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रतील 7 हजार 843 टॅक्सी परवान्यांसाठी आज लॉटरी पद्धतीने वाटप होणार आहे.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रतील 7 हजार 843 टॅक्सी परवान्यांसाठी आज लॉटरी पद्धतीने वाटप होणार आहे. विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता लॉटरी ड्रॉचा शुभारंभ केला जाणार आहे.  सरकारकडील 15 हजार बाद टॅक्सी परवान्यांपैकी 7 हजार 843 परवान्यांचे मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रत नव्याने वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने नुकताच घेतला. टॅक्सी परवान्यांसाठी 6 ते 20 सप्टेंबर्पयत ऑनलाइन अर्ज सेवा उपलब्ध करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाकडे एमएमआरटीए क्षेत्रतून 31 हजार 483 अर्ज आले. (प्रतिनिधी)
 
च्काही कारणांमुळे हे वाटप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 29 नोव्हेंबर रोजी या परवान्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील यशस्वी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठवण्यात येईल.
 
च्ड्रॉनंतर परवाने मिळालेल्या उमेदवारांची यादी महाऑनलाइनच्या ँ33स्र2://3ं7्रस्री1्रे3.ेंँंल्ल’्रल्ली.ॅ5.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. तसेच लॉटरी प्रक्रियेचे प्रक्षेपण मुंबई पश्चिम येथील परिवहन कार्यालयात संध्याकाळी साडेपाच ते सहा या वेळेत दाखविण्यात येणार आहे.