Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेत घराला लागलेल्या आगीत लाखोंचे सामान खाक

By admin | Updated: January 12, 2015 22:16 IST

कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

पनवेल : कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीच्या घटनेमध्ये घरातील सर्व सामान जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कामोठे सेक्टर ७ मधील दीपक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जुबेर शेख व त्यांच्या घरातील सदस्य दुपारी काही कामानिमित्ताने घरातून बाहेर गेले होते. त्या वेळेस ही घटना घडली. घरातून धूर येत असल्याचे सोसायटीमधील रहिवाशांनी पाहिले व अग्निशमन दलाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.