Join us

‘स्वच्छ भारत’ला शहरात उदंड प्रतिसाद

By admin | Updated: November 10, 2014 01:14 IST

स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ऐरोली, सानपाडा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिसराची स्वच्छता केली.

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ऐरोली, सानपाडा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिसराची स्वच्छता केली.सुटीचा दिवस असल्याने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत नवी मुंबईकरांनीही शहर स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतला होता. ऐरोली येथे तरुणांनी एकत्र येऊन ऐरोली स्वच्छता मोहीम राबवली. ममित चौगुले यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत महाविद्यालयीन, उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने सहभाग झाले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत परिसरात स्वच्छता करण्यात आली. तरुणांनीच हातात झाडू घेतल्याने इतर नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे सानपाडा येथे देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रवादीच्या जिल्हा संघटक सुनंदा निकम यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता. याप्रसंगी महापौर सागर नाईक यांनीही उपस्थित राहून शहर स्वच्छ राखण्यात नागरिकांना प्रोत्साहन दिले. त्यानुसार नागरिकांनी रहिवासी सोसायट्यांच्या आवारात स्वच्छता केली. तसेच डेंग्यू, मलेरिया टाळण्यासाठी आवश्यक दक्षतेचीही माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)