Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीमुळे चिमुकल्याने गमावला जीव

By admin | Updated: November 3, 2015 19:32 IST

नाहूर कांजूर परिसरातील रेल्वे यार्डात खेळत असताना सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका १४ वर्षीय मुलाचा ओव्हर हेड वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - नाहूर कांजूर परिसरातील रेल्वे यार्डात खेळत असताना सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका १४ वर्षीय मुलाचा ओव्हर हेड वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव साहिल इसवलकर (१४) असे आहे. ९ वीमध्ये शिकणारा साहिल शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर त्याच्या मित्रासोबत नाहूर स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे सिमेंट यार्ड परिसरात खेळायला गेला होता. त्यावेळी तो त्याठिकाणी उभ्या असलेल्या माल गाडीवर चढला व स्वतःच्या कॅमऱ्यातून फोटो काढू लागला. त्यावेळी त्याचा संपर्क ओव्हर हेड वायरशी आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी जवळपास असलेल्या परिसारात जाऊन मदत मागविली व त्याला तत्काळ राजावाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याधीही देखील कांजूरमध्ये खेळता खेळता एका अल्पवयीन मुलाचा साडीचा फास लागून मृत्यू झाला होता. महिनाभरतील ही दुसरी घटना आहे.