Join us

डोळ्यासमोर आई,वडील आणि बहिणीला गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

अक्षय झिमूरला अश्रू अनावरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चेंबूरच्या भारतनगर येथील दुर्घटनेत चार जणांच्या झिमूर कुटुंबातील सूर्यकांत झिमूर, ...

अक्षय झिमूरला अश्रू अनावर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरच्या भारतनगर येथील दुर्घटनेत चार जणांच्या झिमूर कुटुंबातील सूर्यकांत झिमूर, मीना झिमूर, अपेक्षा झिमूर या तिघांचा मृत्यू झाला आहे, तर राजावाडी रुग्णालयात उपचार घेणारा अक्षय झिमूर सांगतो की, माझ्या डोळ्यासमोरच होत्याचे नव्हते झाले, मी पूर्ण कुटुंब गमावले. हे सांगताना त्याला अश्रू आवरणे अनावर झाले होते.

अक्षयचे वडील ट्रक चालवायचे, आई गृहिणी होती तर बहिणीने नुकतीच पदवी मिळवली होती, ती एका बँकेत कामाला जाणार होती. अक्षय रिक्षा चालवतो. शनिवारी मध्यरात्री जेव्हा भिंत घरावर पडली त्यावेळी अक्षय पोटमाळ्यावर झोपला होता. तर आई, वडील, बहीण खाली होते. पण जेव्हा घरावर घर पडले तेव्हा त्याचे कुटुंब अनेक थरांखाली गाडले गेले. अक्षय स्वतः कसेबसे बाहेर आला. त्याला जवळच एक शेजारची मुलगी ढिगाऱ्याखाली अडकलेली दिसली, त्याने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ती निघाली नाही. मग त्याने काही मुलांना गोळा करून तिला बाहेर काढले मात्र स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना वाचवता आले नाही याचे दु:ख तो व्यक्त करत आहे.