Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेला तोटा

By admin | Updated: June 12, 2014 01:37 IST

महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१० रोजी पीपीपी (पब्लिक अ‍ॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर तसेच रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी स्थानिक परिवहन सेवा सुरू केली

राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेच्या मंजूर तिकीट दराऐवजी प्रशासनाने तब्बल दोन ते चार रुपये भाडे कमी वसूल करण्याच्या फंड्यामुळे गेल्या आठ महिन्यांत या सेवेला सुमारे ६१ लाख २२ हजारांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच मे महिन्यात भाडे वसुली घटल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा आली होती. त्यावर मंगळवारच्या चर्चेत १३ ते १५ जूनदरम्यान थकीत पगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१० रोजी पीपीपी (पब्लिक अ‍ॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर तसेच रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी स्थानिक परिवहन सेवा सुरू केली. या सेवेला चालवण्यासाठी पालिकेने उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीला नियुक्त केले. सेवेच्या करारान्वये पालिकेने ठेकेदाराला बस आगारासाठी अद्याप जागा न दिल्याने परिवहन सेवेतील बस रस्त्यावरच ठाण मांडत आहेत. अलीकडेच पालिकेने घोडबंदर आणि उत्तन येथे बस आगारासाठी जागा देण्याचे तत्कालीन महासभेच्या मंजुरीनंतर मान्य केले. असे असले तरी या जागा अद्याप ठेकेदाराकडे हस्तांतरित केलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या १०० नवीन बसच्या पार्किंगचा प्रश्न जैसे थे राहणार आहे.