Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने लुटले

By admin | Updated: June 7, 2015 00:23 IST

सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एपीएमसी येथील फळ व्यापाऱ्याची २४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

नवी मुंबई : सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एपीएमसी येथील फळ व्यापाऱ्याची २४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.किरीट मायकल या एपीएमसी येथील फळ व्यापाऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे. दीड महिन्यापूर्वी त्यांची ओळख कादीर, इराणी व मुन्ना यांच्यासोबत झाली होती. या ओळखीतून विश्वास संपादन करून तिघांनीही किरीट यांना सोन्याची बिस्कीट देतो असे सांगितले होते. त्याकरिता दोन लाख रुपये अ‍ॅडवान्स देखील त्यांनी दिला होता. अखेर उर्वरित २२ लाख रुपये देवून सोन्याचे बिस्कीट घेण्यासाठी त्यांना माणगाव येथे बोलवण्यात आले होते. त्यानुसार किरीट हे रक्कम घेवून त्या ठिकाणी गेले असता तिघांनीही चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम चोरून पळ काढला. त्यामुळे सोन्याचे बिस्कीट खरेदीचा मोह त्यांना चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)